म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!
म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..! fathers डे बद्दल मी काही माझ्या आभारी भावना वडिलांबद्दल लिहिणे म्हणजे असे होईल कि सूर्याला मी धन्यवाद देत आहे त्याच्या कार्यासाठी, निसर्गाला मी धन्यवाद देत आहे oxygen साठी, एखाद्या वटवृक्षाला धन्यवाद देत आहे शीतल छायेसाठी .. किंवा या समस्त नियतीला धन्यवाद देत आहे या मिळालेल्या जीवनासाठी. खरंच मला नाही वाटत त्यांना एका दिवशी धन्यवाद देऊन काही फरक पडेल? ते अहोरात्र आपल्यासाठी झटत असतात. एक वडील किंवा बाप आपल्या अपत्यासाठी किंवा माझे वडील माझ्यासाठी नक्कीच वरील दिलेल्या उदाहरणा सारखेच आहेत. म्हणजे आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक श्वासावर त्यांचा अधिकार आहे. कितीतरी गोष्टी आणि आठवणी लहानपणापासून मनात बिंबवल्या गेल्या असतात ना जेव्हा आपण 'बाबा' हा शब्द उच्चारतो? खरंच बापाचे महत्व आणखी जास्त मला तेव्हा कळले जेव्हा मी स्वतः 'बाप' झालो. आपल्या चिमुकल्यांना शांत, आनंदात आणि सुखाने राहण्यासाठी जेव्हा हा बाप कष्ट, अपमान सहन करतो पण तरीही मनात एकच आशा असते ती अशी कि त्यांना संपूर्ण आयुष्यात कधीच आणि कोणताही त्रास होऊ न...

Comments
Post a Comment