करूया सामना तणाव आणि नैराश्याचा!

करूया सामना तणाव आणि नैराश्याचा!

जीव कोणाचा का असेना, जेव्हा अश्या जाण्याच्या गोष्टी कानांवर पडतात ना, खरंच थोडा वेळ मन कोणत्या विश्वात भटकते काहीच कळत नाही. नैसर्गिकरित्या मृत्यू नियम आहे आयुष्याचा मान्य आहे पण जेव्हा 'आत्महत्या' हा शब्द कानावर पडतो ना तेव्हा नकळत डोळ्यासमोर येतात हताश आणि हतबल चेहेरे जे अयशस्वी होऊन जीवनाला आणि परिस्थितीला कंटाळले आहेत आणि म्हणून कदाचित असा टोकाचा निर्णय घेतात. WHO च्या एका अहवालानुसार २६.४ करोड लोकं नैराश्य घेऊन जगत आहेत. या प्रचंड आकड्यात कदाचित तुमचा एखादा प्रिय व्यक्ती असू शकतो किंवा कदाचित तुम्ही सुद्धा. त्यांना वेळेत ओळखायला शिका. सर्वांना गृहीत धरून चालू नका. प्रत्येकाच्या भावना, विचार सतत बदलत असतात तेव्हा त्यांना समजून घेण्याची जरा सवय लावून घ्या. दुसऱ्यांशी बोलायला शिका, त्यांच्या गोष्टी मग त्या कितीही लहान किंवा निरर्थक वाटो तुम्हाला, त्यांना शांतपणे ऐकून घ्या. आपल्या जवळ कोणी तरी मनातलं बोलायला आहे हि इतकी सोपी गोष्ट देखील कधीतरी खूप सुखावून जाते. कदाचित तुमच्या एका शब्दाने कोणाचे प्राण वाचू शकतील. सध्या कोरोना मुळे आधीच जग खूप तणावाखाली जगत आहे. लाखो लोकांना भविष्याची चिंता मनातून खात आहे, हळूहळू कमजोर मनाची माणसं नैराश्याकडे वळत आहेत. एक वृत्तपत्र उघडून बघा कळेल तुम्हाला. या सर्व भयावह स्थितीमध्ये आज सुशांत सारख्या परिपूर्ण कलाकाराची बातमी येते काय आणि मन सुन्न करून जाते. खरंच 'आत्म' हत्या हा पर्याय असूच शकत नाही कारण याने जो निघून जातो तो जरी नाहीसा होतो तरी त्याच्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील असंख्य लोकांवर किती नकारात्मक परिणाम होतो? बरेच आशावादी लोकं कोरोना मधून बाहेर निघायची वाट बघत आहेत, मनात नवीन स्वप्नं घेऊन आशेवर जगत आहेत, त्यांच्या उमेदीवर अश्या घटना म्हणजे विरजण घातल्या सारखे होईल असे नाही का वाटत तुम्हाला? तेव्हा मित्रांनो, शक्य असेल तितके बोलत राहा आपल्या व्यक्तींशी, त्यांच्या बोलण्या, वागण्यातील फरक ओळखा. त्यांना भावनिक आधार हवा असेल तेव्हा संभाषण हरवू देऊ नका. प्रत्येकाला कोणाची तरी गरज आहेच, हे कृपया विसरू नका. शक्य तितके व्यक्त होण्याचा प्रयत्न करा आणि काहीही झाले तरी सकारात्मकता मनातून ढळू देऊ नका. उम्मीदपर दुनिया कायम हैं - ऐकले असेल सर्वांनी. तेव्हा नकारात्मकतेला मनात शिरकाव करू देऊ नका, निदान तुमच्या आपल्या लोकांसाठी कारण तुम्हाला बघून इतर कितीतरी लोकं प्रेरणा घेत असतात. तेव्हा एवढीच अपेक्षा आहे कि जरी सध्यस्थिती कठीण आहे तरी अशक्य नक्कीच नाही. काळजी घ्या आणि संपर्कात राहा. जीवन खूप सुंदर आहे आणि शिकण्यासारखे अजून बरेच काही आहे जीवनात.
प्रा. अमूल तांबोळी
 

Comments

Popular posts from this blog

म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!

Ten years journey from a banker to an academician…

'How to produce creative content & find the right audience?'

I still remember that hoarding......

Soft Skills play crucial role in overall success of any business.

‘Rural students & Communication skills’ are they really connected?

माझ्या आठवणीतले बस स्टॉप

'मैत्रीदिन' विशेष-अमूल

"Rains always remind me, my memories with 'Pune' ..." - Amul S. Tamboli