म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!

म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!

fathers डे बद्दल मी काही माझ्या आभारी भावना वडिलांबद्दल लिहिणे म्हणजे असे होईल कि सूर्याला मी धन्यवाद देत आहे त्याच्या कार्यासाठी, निसर्गाला मी धन्यवाद देत आहे oxygen साठी, एखाद्या वटवृक्षाला धन्यवाद देत आहे शीतल छायेसाठी .. किंवा या समस्त नियतीला धन्यवाद देत आहे या मिळालेल्या जीवनासाठी.  खरंच मला नाही वाटत त्यांना एका दिवशी धन्यवाद देऊन काही फरक पडेल? ते अहोरात्र आपल्यासाठी झटत असतात. एक वडील किंवा बाप  आपल्या अपत्यासाठी किंवा माझे वडील माझ्यासाठी नक्कीच वरील दिलेल्या उदाहरणा सारखेच आहेत. म्हणजे आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक श्वासावर त्यांचा अधिकार आहे. कितीतरी गोष्टी आणि आठवणी लहानपणापासून मनात बिंबवल्या गेल्या असतात ना जेव्हा आपण 'बाबा' हा शब्द उच्चारतो?  खरंच बापाचे महत्व आणखी जास्त मला तेव्हा कळले जेव्हा मी स्वतः 'बाप' झालो. आपल्या चिमुकल्यांना शांत, आनंदात आणि सुखाने राहण्यासाठी जेव्हा हा बाप कष्ट, अपमान सहन करतो पण तरीही मनात एकच आशा असते ती अशी कि त्यांना संपूर्ण आयुष्यात कधीच आणि कोणताही त्रास होऊ नये, ते नेहेमी आनंदात असायला पाहिजे हिच भावना मनात रुजलेली असते. असा असतो एक बाप. ती एकमेव व्यक्ती अशी असते या जगात जिला नेहेमी तुमचे यश आणि किर्ती त्याच्या स्वतःपेक्षा जास्त असावी असेच वाटते. कुठे मिळेल असे निरपेक्ष प्रेम. जगाशी ओळख करून देतो तो बाप, तुमच्यासाठी काय योग्य किंवा अयोग्य आहे ते प्रामाणिक पणे तुम्हाला सांगतो तो बाप, स्वतः वेळ आली तर उपाशी राहील पण तुम्हाला घास भरवेल तो बाप, वेळ आली तर आपले श्वाससुद्धा आपल्या मुलांना द्यायला क्षणाचाही विलंब न करेल तो बाप खरंच धन्य आहे. प्रत्येक बाप हा त्याच्या अपत्यांमध्ये आपले हरवलेले बालपण नेहेमी शोधत असतो, निदान मी तरी तेच करत असतो. प्रेम आणि आपुलकी सोबत बऱ्याचदा एका बापाला कठोर भूमिका सुद्धा घ्यावी लागते. तो हे करतो कारण त्याने हे जग जवळून पाहिले आहे आणि खरं म्हणजे मित्रांनो 'दुनियादारी' शिकायची असेल ना तर ती फक्त आपल्या बापाकडूनच शिकवी कारण त्यात कोणतीच भेसळ असणे शक्य नाही, कधीच नाही. तेव्हा शेवटी एकच गोष्ट सांगतो, आपल्या बापाचा मान ठेवा सर्वांत उच्च स्थानी, मग तो कसाही असो- गरीब, श्रीमंत, रोगी, निरोगी, प्रेमळ , कठोर; अगदी कसाही त्याला फक्त प्रेम द्या. कारण आजपर्यंत जसे तुम्ही त्याला दुर्लक्षित केले आहे तसेच कदाचित जगानेही केले असेल. एक आणखी लक्षात असू द्या कि आई आपले मन रडून मोकळे करून घेईल पण हा पर्याय प्रत्येक 'बाप' वापरेल असे होत नाही. मनात जेव्हा काहूर माजते, बाहेरची प्रतिकूल परिस्थिती आणि इतरांकडून न मिळणारी 'भावनिक सोबत' हि या प्रवासात कदाचित त्यासाठी एका संजीवनी सारखी काम करेल. त्यामुळे त्याला गरज आहे समजून घेण्याची, त्याची व्यथा ऐकून घेण्याची. त्यालाहि तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्या आणि सांगा कि 'बाबा, आमच्या आयुष्यात सर्वांत महत्वाचे काही असेल तर फक्त तुम्ही.'  तेव्हा सर्वांना आजच्या FATHERS डे च्या असंख्य प्रेमळ शुभेच्छा देतो. धन्यवाद. 
- अमूल तांबोळी 

Comments

Popular posts from this blog

Ten years journey from a banker to an academician…

'How to produce creative content & find the right audience?'

I still remember that hoarding......

Soft Skills play crucial role in overall success of any business.

करूया सामना तणाव आणि नैराश्याचा!

‘Rural students & Communication skills’ are they really connected?

माझ्या आठवणीतले बस स्टॉप

'मैत्रीदिन' विशेष-अमूल

"Rains always remind me, my memories with 'Pune' ..." - Amul S. Tamboli