आज हा विचार केला का कोणी?

आज हा विचार केला का कोणी?


आजचा दिवस तसा विशेष म्हणावाच लागेल कदाचित म्हणून कि काय याबद्दल काही ओळी लिहिणे जणू काही मला आवरले नाही. तर आज दोन मोठ्या गोष्टी योगायोगाने एका दिवशी आल्या आहेत, पहिली तर 'जागतिक पर्यावरण दिवस' आणि दुसरे म्हणजे 'वटपौर्णिमा.' एकिकडे निसर्गाची आणि संपूर्ण जीवसृष्टीची संरक्षण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण तर दुसरीकडे एका वडाच्या (जो पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे) त्या झाडाला स्वतः च्या नवरोबाच्या सलामतीसाठी धागा बांधण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा. एकिकडे शास्त्र तर दुसरीकडे श्रद्धा (कि अंधश्रद्धा?). त्या वादात मी आता पडत नाही कारण माझा विषय दुसरा आहे या लेखात. माझ्या 'सौ' ला वडाकडे पूजेला नको जाऊ बोललो (कोरोनाच्या धास्तीने या वर्षी), तर जसं काही LIC च्या 'टर्म पॉलिसाचा प्रीमियम नको भरू' असं बोलल्या सारखी तिची भयानक प्रतिक्रीया होती. शेवटी या प्रसंगातून एका शहाण्या नवऱ्याने एकच धडा घ्यायचा, बायकोला काही गोष्टी फक्त तिच्या मनाप्रमाणेच करू द्यायच्या. कारण उद्या चालून आपल्या काही जीवाचे बरे वाईट झाले तर बघा बुवा यांनीच 'वटपौर्णिमा करू दिली नाही आणि हे असे झाले' असंही कदाचित त्या बोलू शकतात, नाही का? पण काहीही असो, गंमत बाजूला ठेऊन, निदान आज आपण या सुवर्ण योगातून एक छान बोध घेऊ शकतो, तो कसा? तर पर्यावरण रक्षण करायचे असेल तर सर्वात सोपे आणि असरदार उपाय झाडे लावणे आहे, बरोबर. पण त्या झाडाची काळजी पण घ्यायची बरं का? नाही तर वृक्षारोपणाची जागा तीच राहते फक्त रोपं आणि लावणारी लोकं बदलतानाही मी बऱ्याचदा पाहिलं आहे. पर्यावरण जनजागृती साठी जे महाविद्यालयातील NSS ची पथके असतात ती एक काम करू शकतात कि प्रत्येक कुटुंबानुसार एका नवीन वृक्षाचे रोपण आणि त्याच्या देखभालीचा संपूर्ण तपशील तयार करून (विद्यार्थी आणि प्रभाग विभागून) त्याचे विद्यापीठाला वार्षिक सादरीकरण करताना विशेष शाबासकी मिळवू शकतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आजची वटपूजा हि मला खूप अर्थपूर्ण वाटली कारण झाडे हि वास्तविक आपल्याला ऑक्सिजन देऊन जीवदान देतात म्हणजे एक प्रकारे आपले रक्षणच करतात. म्हणून निसर्ग आणि पर्यावरणांविषयी एक कृतज्ञता म्हणून जर कोणी त्याचे पूजन करत असेल तर चांगलेच आहे ना? आम्ही सुद्धा करू जर उद्देश हा असा असेल तर, फक्त प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे कि त्यांच्या प्रत्येक कृतीचा आधार फक्त आणि फक्त 'विज्ञान' असावा. एवढाच आशय आहे हे लिहिण्यामागे कारण दृष्टीकोण बदलला कि मानसिकता बदलते आणि त्यातून मग कृती बदलत जाते.
- अमूल तांबोळी

Comments

Popular posts from this blog

म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!

Ten years journey from a banker to an academician…

'How to produce creative content & find the right audience?'

I still remember that hoarding......

Soft Skills play crucial role in overall success of any business.

करूया सामना तणाव आणि नैराश्याचा!

‘Rural students & Communication skills’ are they really connected?

माझ्या आठवणीतले बस स्टॉप

'मैत्रीदिन' विशेष-अमूल

"Rains always remind me, my memories with 'Pune' ..." - Amul S. Tamboli