'मैत्रीदिन' विशेष-अमूल
'मैत्रीदिन' विशेष-अमूल
'A friend in need is a friend in deed' किती खरं आहे ना हे वाक्य. मित्रांशिवाय जगणं अगदी अशक्यप्राय वाटते ना? मैत्री म्हणजे नेमके काय? ती का, कशी आणि कोणासोबत करावी असले प्रश्न पडले का कधी तुम्हाला? जर उत्तर 'हो' असेल तर कृपया हा लेख एकदा नक्कीच वाचा, हि नम्र विनंती.
मैत्री हि ठरवून कधीच होत नसते, कारण ठरवलेल्या गोष्टींमध्ये नेहमी एक स्वार्थीपणा दडलेला असतो.
खरी मैत्री ची व्याख्या करणे सुद्धा खूपच कठीण आहे, कारण मैत्रीमध्ये कोणताच तोलमोल कधीही नसतो.
मैत्री हि फ़क्त मैत्रीच असते. ती अनुभवायची असते निर्मळ मनानी आणि निभावायची असते आपल्या निस्वार्थी भावनांनी.
मैत्री, मग ती कर्णाने केलेली काय किंवा सुदाम्यानें केलेली काय, नेहमी सारखीच असते. किंबहुबा जर एका पारड्यात आपण मैत्री आणि दुसऱ्यात प्रेम मोजायला जरी गेलो ना तरीसुद्धा मैत्रीचे पारडे सदैव जड़च राहिल.
कारण त्यात अनावश्यक अपेक्षा नसतात, असतात ती फ़क्त निखळ मने आणि निरागसता. मनमोकळे हस्याचे काही क्षण.
सोप्या भाषेत सांगायचे झालेच ना तर माझ्या मते मैत्री हि जीवनात तशीच आहे जसे आपल्या खाद्य पदार्थांमध्ये 'मीठ' आहे. ते कधी नसले कि सगळे अगदी कसे बेचव होऊन जाते.
प्रत्येक नात्यांमध्ये थोड़ी का असेना मैत्री हि असायलाच हवी कारण तेव्हाच ते अनुभवायला आणि निभावायला खुप छान वाटेल, बिना मैत्रीचे कोणतेही नाते फ़क्त औपचारिकता म्हणून राहून जाते बऱ्याचदा.
त्यामुळे मैत्री या अश्या गोड़ नात्याला नेहमी मनात काळजीने जपून ठेवा.
आपल्याला आयुष्य मजेत जगायला शिकवते ती मैत्री, प्रत्येक कठीण प्रसंगाला सोप्प करते ती मैत्री.
अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करुण दाखवते ती असते मैत्री. जिथे फ़क्त मी पणा संपूण नेहमी आपलेपणा चे वास्तव्य असते ती जागा म्हणजे मित्रांचे ह्रदय. सर्वसमावेशक अश्या ह्या मैत्रीमध्ये एका आईच्या वात्सल्याची, वडिलांच्या काळजीची, दादाच्या आपुलकीची, बहिणीच्या आपलेपणाची, आजी आजोबांच्या संरक्षणात्मक मायेची ऊब, एका प्रेयसीच्या मिलनाची आसक्ती आणि ईश्वराच्या ठायी असलेली आपली निस्सीम भक्ती, अगदी सर्व काही असते ते फ़क्त एका शब्दात, अर्थातच मैत्रीत. तेव्हा आयुष्यात नाते शोध्यापेक्षा प्रत्येक नात्यात मैत्री शोधायला शिका. मैत्रीला कशाचे बंधन हो, ना जात पात, ना वयाने लहान मोठे, ना स्त्री पुरुष, ना गरीब श्रीमंत, ना हुशार किंवा ढ, फ़क्त एकच गरज असते या मैत्रीच्या नात्याची ती म्हणजे समोरच्याला जर कधी तुमची गरज भासली तेव्हा तुमची वेळेत आलेली एक साद, ती म्हणजे 'होय, मी आहे, काळजी करू नको', या पलिकड़े काहीच नको इथे.
तेव्हा आजच्या मैत्री दिनानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देऊन वेळात वेळ काढून माझे दोन शब्द वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
अशीच आपली सुद्धा (प्रोफेशनल फ्रेंडशिप) मैत्री सदैव असू द्या हिच विनंती.
- श्री. अमूल तांबोळी (02/08/2020)
Nicely expressed thoughts sir.. keep it up
ReplyDeletethanks a lot Sir.. it means a lot..
DeleteEach and every line 💯 true . Awesome 💓👌👌👌
ReplyDelete