'बाबा तुम्ही घरी कधी येताय?'- अमूल

'बाबा तुम्ही घरी कधी येताय?'- अमूल 

 

दिवसामागून दिवस इकडे कसे पटापट सरताय, 

गावाकडची लेकरं मात्र सतत विचारताय,

कि 'बाबा तुम्ही घरी कधी येताय?'

'बाबा तुम्ही घरी कधी येताय?'

 

एकमेकांत आम्ही गुंतलो आहोत असे काही, 

कि गेल्या कित्येक वर्षात 'मी त्यांना दिसलो नाही'

असा एक हि दिवस नाही कि रात्र नाही,

असा एक हि दिवस नाही कि रात्र नाही. 


पोटा पाण्यासाठी दहा गावी भटकणे,

अजून तरी माझे थांबले नाही, 

अशी कित्येक स्वप्नं मी हि रंगवली

मात्र ती सत्यात कधी अवतरली नाही

ती सत्यात कधी अवतरली नाही.


स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे 

प्रयत्न मी कधी सोडले नाही, 

यश मिळो कि अपयश 

आत्मविश्वास माझा कधी सरला नाही

आत्मविश्वास माझा कधी सरला नाही.


आठवण मात्र सतत येते त्या प्रेमाची आणि घराची,

पण समजूत शेवटी मलाच काढावी लागते माझ्या या वेड्या मनाची,

माझ्या या वेड्या मनाची.


विचारतात बरेच जण कि सर कसे वाटते सध्या असे दूर राहून?  

काय उत्तर द्यावे मलाच कळत नाही समोरच्याचा हा प्रश्न ऐकून,

समोरच्याचा हा प्रश्न ऐकून.

 

येतात पाखरं दूर कधी, आपलेही घरटे सोडून, 

पण सांगा मला, कोणता जीव आनंदी असतो,

त्यांच्या घरकुलाला सोडून?

त्यांच्या घरकुलाला सोडून?


हास्य नावाचा खोटा दागिना सध्या घेऊन मी मिरवतोय, 

पण माझे मलाच माहिती आहे कि कोणत्या आठवणीत 'मी झुरतोय?',

कोणत्या आठवणीत 'मी झुरतोय?'. 


विरहाचे हे दिवसही एक दिवस सरतील, 

स्वप्नांची पारिजातकं पुन्हा बहरतील.  

मनाच्या बागेतली फुलं मी आज हि एक एक करून वेचतोय, 

सुकलेले का असेना त्या फुलांना उगाच सजवतोय, 

सुकलेले का असेना त्या फुलांना उगाच सजवतोय. 


म्हणतात कि नातं घट्ट होण्यासाठी थोडासा दुरावा हा हवाच, 

कदाचित त्या कठीण कसौटीचा तो क्षण असावा हाच. 

- अमूल ✍🏻

Comments

Popular posts from this blog

म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!

Ten years journey from a banker to an academician…

'How to produce creative content & find the right audience?'

I still remember that hoarding......

Soft Skills play crucial role in overall success of any business.

करूया सामना तणाव आणि नैराश्याचा!

‘Rural students & Communication skills’ are they really connected?

माझ्या आठवणीतले बस स्टॉप

'मैत्रीदिन' विशेष-अमूल

"Rains always remind me, my memories with 'Pune' ..." - Amul S. Tamboli